By  
on  

PeepingMoon Exclusive: शाहिद कपूरने साईन केला नेटफ्लिक्सचा एक्शन-थ्रीलर सिनेमा, आदित्य निंबाळकर करतायत दिग्दर्शन

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात संकोच मानत नाहीत तर उलट ती सुवर्णसंधी मानतात. अनेक मोठमोठे सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित झाले तर आणखी आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आता ओटीटीला पर्याय नाही. 

पिपींगमून डॉटकॉमला नुकतंच एक्स्क्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, बॉलिवुड अभिनेता शाहीद कपूरसुध्दा आपल्या डिजीटल डेब्यूसाठी सज्ज झाला आहे.  कबीर सिंह नंतर शाहीदच्या हातात हे बिग बजेट प्रोजेक्ट आलं आहे. ग्लोबल पातळीवरचा प्रसिध्द ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससाठी शाहीद आता एक एक्शन-थ्रीलर सिनेमा करतोय. तसंच त्याने हे प्रोजेक्ट अधिकृतरित्या साईन केल्याचंसुध्दा कळतंय. 

पिपींगमूनने फ्रेबुवारीमध्येच शाहिदच्या या एक्शन थ्रीलर सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित होण्याबाबत वृत्त दिलं होतं. आता हा सिनेमा  नेटफ्लिक्सवर येतोय. अद्याप या सिनेमाचं टायटल निश्चित झालेलं नाही. 

हे अनटायटल प्रोजेक्ट ‘ऑपरेशन कॅक्टस' या भातारताच्या मिशनवर आधारित आहे. ज्याला भारत सरकारने 1988 मालदीव द्वीप येथे लॉंच केलं होतं.  तीन दशकांपूर्वी तेथे बंडाची परिस्थिती उद्भवली होती तेव्हा भारताने मालदीवमध्ये सेनादले पाठवून बंड मोडून काढले होते आणि तत्कालीन सरकारची पुनस्र्थापना केली होती. 

मालदीवमध्ये १९८८ साली मौमून अब्दुल गयूम हे अध्यक्ष होते. त्यांच्या राजवटीविरुद्ध १९८० आणि १९८३ साली बंडाचे प्रयत्न झाले होते. पण ते फारसे गंभीर नव्हते. १९८८ साली मालदीवचे प्रभावशाली व्यापारी अब्दुल्ला लुथुफी यांनी श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांच्या पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (प्लोट) नावाच्या संघटनेबरोबर हातमिळवणी करून गयूम यांच्याविरुद्ध बंड केले. सुमारे ८० बंडखोरांनी मालवाहू जहाजावरून मालदीवची राजधानी मालेमध्ये लपून प्रवेश केला. तत्पूर्वी साधारण तेवढेच बंडखोर पर्यटकांच्या वेशात मालेमध्ये घुसले होते. या बंडखोरांनी राजधानी मालेमधील महत्त्वाच्या सरकारी इमारतींचा, रेडिओ स्टेशन आदींचा ताबा घेतला. अध्यक्ष गयूम यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र गयूम बंडखोरांपासून निसटले आणि त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गयूम यांची मागणी मान्य करून ताबडतोब मदत पाठवली. भारतीय सेनादलांच्या मालदीवमधील कारवाईला ऑपरेशन कॅक्टस असे सांकेतिक नाव दिले होते.

 

'कमीने', 'हैदर', 'रंगून' आणि  'पटाखा'  अशा सिनेमांसाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना सहाय्यक म्हणून करणारे दिग्दर्शक आदित्य निंबाळकर या ऑपरेशन कॅक्टसची धुरा सांभाळतायत.तर नेटफ्लिक्सच्या ह्या सिनेमाची निर्मिती अमर बुटाला करतायत. 
या सिनेमाची अधिकृत घोषणा नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive