PeepingMoon Exclusive : अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' ओटीटीवरच होणार रिलीज

By  
on  

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात संकोच मानत नाहीत तर उलट ती सुवर्णसंधी मानतात. अनेक मोठमोठे सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित झाले तर आणखी आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आता ओटीटीला पर्याय उरला नाहीय. 

अशातच पिपींगमून डॉटकॉमला नुकतंच एक्स्क्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमार स्टारर बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' ओटीटी प्लॅटफॉर्म  डिस्टे + हॉटस्टारवरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार नाही, ही पूर्णपणे फेक न्यूज असल्याचं समजतंय. सिनेमाच्या प्रोडक्शन सूत्रांच्या माहितीनुसार, हा सिनेमा येत्या दिवाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोव्हेंबर १३ ही टेन्टीटिव्ह तारीखसुध्दा निश्चित झाली होती. 

फेक न्यूजमद्ये असं सांगण्यात आलं होतं की, अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर व राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा सिनेमा आता थेट लॉकडाऊन संपल्यानंतर आणि सिनेमा थिएटर सुरु झाल्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  पण ही बातमी पूर्णत: चुकीची आहे.  पिपींगमूननला ही बातमी चुकीची असल्याचं खात्रीशीर वृत्त मिळालंय. 

आता 'लक्ष्मी बॉम्ब'  हा सिनेमा थेट ओटीटीवरच रिलीज होतोय आणि वरुण धवन व सारा अली खानच्या 'कूली नंबर वन'सोबत तो क्लॅश करणार आहे. तसंच सूत्रांनी पुढे सांगितलं, ह्या सिनेमाचं थोडंफार पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी आहे, जे अक्षय स्कॉटलंडवरुन परतल्यावर पूर्ण करणार आहे. सध्या तो स्कॉटलंडला बेलबॉटम या त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करतोय.

पण अजूनतरी 'लक्ष्मी बॉम्ब' च्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली नाहीय .

 

Recommended

Loading...
Share