By  
on  

दिग्दर्शक सुजय डहाकेचे दोन सिनेमे पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘शाळा’, ‘आजोबा’ आणि सायन्स फिक्शन ‘फुंतरू’ असे विविध धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येणारा युवा दिग्दर्शक सुजय डहाके लवकरच एक आगळी वेगळी मराठी वेबसिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शाळा’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कलाकृती सादर करताना प्रेक्षकांच्या पसंतीस ती कितपत उतरेल यासाठी सुजयवर थोडं दडपण असलं तरी प्रत्येक प्रोजेक्टवर तो कसून मेहनत घेताना दिसतो. आगामी ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ निमित्ताने लेखक-दिग्दर्शक सुजय डहाकेसोबत पिपींगमून मराठीने केलेली ही खास बातचित

प्रश्न: ब-याच कालावधीने सेक्स,ड्रग्ज & थिएटर ही वेबसिरीज घेऊन तु प्रेक्षकांसमोर येतोय,याबद्दल काय सांगशील?
उत्तर: हो ब-याच कालावधीनंतर मी ही वेबसिरीज घेऊन येतोय. वेबसिरीज हे सिनेमा आणि मालिकांपेक्षा आज जास्त प्रभावी माध्यम समजलं जातं. सहा महाविद्यालयीन मुला-मुलींची ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’  ही कथा आहे. नावाप्रमाणेच सेक्स, ड्रग्स आणि थिएटर याभोवती याचे भाग उलगडत जातात. त्यानंतर मग या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कशा नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ वेबसिरीजचा पहिला सीझन लवकरच प्रदर्शित होतोय. एकूण 10 भागांची ही सिरीज आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढच्या सीझनचीसुध्दा आमची तयारी सुरु आहे. झी 5 सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे ही वेबसिरीज घेऊन येण्यास मी खुपच उत्सुक आहे.
प्रश्न: सेक्स, ड्रग्स & थिएटर या वेबसिरीजमध्ये कोणते नवीन चेहरे पाहायला मिळणार
उत्तर: या वेबसिरीजमध्ये तुम्हाला नवीन चेह-यांसोबतच अनेक प्रसिद्ध चेहरेसुध्दा झळकणार आहेत. त्यामुळेच ही वेबसिरीज पाहणं खुपच रंजक ठरेल.
युवा दिग्दर्शक म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं?
उत्तरहो, मी त्याच वयाचा असल्याने माझी थॉट प्रोसेस व कथेचं सादरीकरण नेहमी तशाच प्रकारच्या कथानकाभोवती फिरतं. त्यामुळे तरुणाई आणि माझे सिनेमे, वेबसिरीज असे सर्वच प्रोजेक्ट्स हे जणू समीकरणच झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे युवा वर्गाल ते भावतंय, यातंच सारं काही आलं.

प्रश्न: शाळा, आजोबा, फुंतरू या सिनेमानंतर तुझ्या आगामी सिनेमाची आम्ही वाट पाहतोय, याबाबत जाणून घ्यायचंय.
उत्तर:  नक्कीच, सध्या मी एक नाही तर दोन सिनेमांच्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. पुढच्या वर्षी 2019 मध्ये हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. परंतु याची अधिकृत घोषणा होईपर्यंत तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल.
प्रश्न: फुंतरु सिनेमानंतर सिनेरसिकांनी आणि समिक्षकांनी बरंच कौतुक केलं, अशी चर्चा होती की फुंतरुचा सिक्वल येतोय?
उत्तर: हो. फुंतरु हा मराठीतला पहिला सायन्स-फिक्शन सिनेमा. सर्वांनाच तो खुप आवडला. यासाठी  वीएफक्सचा बराच वापर करण्यात आला होता, माझी या सिक्वलची तयारी म्हणजे लेखन जरी झालं असलं तरी या सिक्वलसाठी लागणारं अद्यावत तंत्रज्ञान शिकणं गरजेचं आहे. पण अजूनही वर्क इन प्रोग्रेसच आहे.

दिग्दर्शक सुजय डहाकेला ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’  या लवकरच प्रदर्शित होणा-या वेबसिरीजसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीकरता पिपींगमून मराठीतर्फे खुप शुभेच्छा !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive