दिग्दर्शक अक्षय इंडीकरचे फेसबुक पेज हॅक, शेअर केली पोस्ट

By  
on  

आज सोशल मिडीया अकाऊंटस जितकी आपल्या कामासाठी सोयीची झाली आहेत, त्याचा वापर जितका वाढला आहे. तितकाच त्याचा  गैरवापरही वाढला आहे. फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ यांसारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा दिग्दर्शक अक्षय इंडीकर याचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अक्षयनेच स्वत: फेसबुकवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. 

अक्षय आपल्या पोस्टमध्ये लिहतो," माझे खाते हॅक केले गेले आहे आणि त्याचा गैरवापर केला जात आहे. अयोग्य अश्लील प्रतिमा अपलोड केल्या जात आहेत आणि माझ्या मित्र सूचीतील लोकांना संदेश पाठविले जात आहेत. गैरवर्तन किंवा पैसे विचारणार्‍या संदेशासारख्या संशयास्पद संदेशास प्रतिसाद देऊ नका. मी कोणालाही निरोप पाठवत नाही.आम्ही चालवत असलेल्या पेज वरून अश्लील कंटेंट प्रसारित होतो आहे , अयोग्य लोक त्या पेज चे ऍडमिन बनून जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत आहेत"

तसंच अक्षयने चाहत्यांना या फेसबुक पेजवरच्या कुठल्याही कंटेटला प्रतिसाद न देण्याचं आवाहन केलं आहे. 

 

My account has been hacked and is being misused. Inappropriate images are being uploaded and messages are being sent to...

Posted by Akshay Indikar on Monday, September 28, 2020

 

 

 

अक्षयने ‘त्रिज्या’, ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘स्थलपुराण’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यातील ‘स्थलपुराण’ यंदाच्या ब्राझील सिनेमा महोत्सवात झळकणार आहे. या महोत्सवात झळकणारा स्थलपुराण हा पहिला मराठी सिनेमा ठरणार आहे. ब्राझील सिनेमहोत्सवाला सिनेविश्वात मानाचं स्थान आहे. 

 

 

 

Recommended

Loading...
Share