‘कारखानीसांची वारी’ ह्या मराठी सिनेमाची टोकीयो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

By  
on  

एक नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘कारखानीसांची वारी’ असं या सिनेमाचं हटके  नाव आहे. अभिनेता अमेय वाघने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच उलगडलं. विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा टोकीयो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेला आहे. त्यामुळे सिनेमाच्या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

‘कारखानीसांची वारी- एशेस ऑन रोड ट्रिप’ असं या सिनेमाचं नाव आहे. म्हणजेच अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाची ही गोष्ट असणार असं दिसतंय. मंगेश जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अमेय वाघसोबतच या  सिनेमात मोहन आगाशे, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले,  मृण्मयी देशपांडे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी आदी कलाकारांच्या ह्यात महत्त्वपूर्ण  भूमिका आहेत.  

अमेय वाघने ‘कारखानीसांची वारी’ या सिनेमाबाबतची पोस्ट करताना म्हटलंय, “नवीन चित्रपट तयार आहे आणि तो टोकीयो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेलाय म्हणून आम्ही खुप उत्साही आहोत.” 

संपूर्ण मराठी सिनेविश्वातून या सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय भरारीनिमित्त कौतुकाचा वर्षाव तर होतच आहे, त्याचबरोबरीने सिनेरसिकांना या सिनेमाची उत्सुकतासुध्दा लागलीय. 
 

Recommended

Loading...
Share