गायिका प्रियांका बर्वेने या अंदाजात पती सारंगला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वेच्या घरी नुकताच नवा पाहुणा आला आहे. प्रियांकाने नुकताच तिच्या बेबी बॉयचं नाव चाहत्यांशी शेअर केलं. युवान असं तिच्या मुलाचं नाव आहे. काही दिवसापुर्वीच तिने मुलासोबतचा गोड फोटोही शेअर केला होता. 
आता तिने पती सारंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘बाबा झाल्यानंतरचा तुझा पहिलाच वाढदिवस आहे. पालकत्वाच्या जबाबदारीची समान वाटणी होईल असं मला वाटत नव्हतं. पण तू ते दाखवून दिलंस. सगळ्यात चांगला मित्र आणि उत्तम वडील असलेल्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ प्रियांका गायिका आहे तर सारंग सरोद वादक आहे.

Recommended

Loading...
Share