कोविड काळात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने दिला हौशी नाट्यसंस्थांना मदतीचा हात

By  
on  

करोना महामारीमुळे बंधनकारक असलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी यांच्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक कलाकारांचे हाल झाले आहेत. यामध्ये हौशी नाट्यकलाकारही आणि संस्थाही अपवाद नाही. हौशी नाट्यसंस्थांच्या मदतीला आता अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद धावली आहे. अ.भा.म.ना.पचे प्रमुख कार्यवाह असलेले शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अ.भा. म.ना.परीषदेचा महत्वाचा निर्णय

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe) on

 

या आवाहनामध्ये ते म्हणतात, ’59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सहभागी 2019 मध्ये झालेल्या संस्थांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने घेतला आहे.’  या संदर्भातील डिटेल्स नाट्यपरिषदेच्या संकेत स्थळावर पाठण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Recommended

Loading...
Share