By  
on  

अवधूत गुप्तेला भारतीय पोस्टकडून मिळाली ही खास भेट

गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो चाहत्यांशी त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत चर्चा करत असतो. आता मात्र त्याने एक खास गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. ‘राष्ट्रीय डाक सप्ताह‘ च्या निमित्ताने पोस्ट खात्यातील कर्मचा-यांनी त्यांच्या विभागातील एक कलाकार या नात्याने अवधूतचा सत्कार केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“चिट्ठी आयी है” पासून “संदेसे आते हैं ” पर्यंत, भारतीयसिने आणि सुगम संगीतामध्ये पत्रं आणि पोष्टाचं स्वतःचं एक वेगळं स्थान कायमच राहिलेलं आहे. आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये क्षणात इथून तिथे पोहोचणाऱ्या ईमेलला ‘पत्रा‘ची सर येणे केवळ अशक्य! पत्राला कसा.. आपल्या दूरवरच्या माणसाच्या हाताचा स्पर्श असतो.. त्याच्या शाईचा वास येतो! आणि त्यात भर पडते ती म्हणजे उन्हातान्हातून पॅंडल मारत तुमच्यापर्यंत पत्र पोहोचवणाऱ्या त्या पोस्टमनच्या श्रमांची. खरं तर, प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी कुठलेही काम न काढता पोस्टात जावे आणि तिथल्या आपल्या पोस्टमास्तरला आणि पोस्टमनला एखादा गुलाबाचा गुच्छ सप्रेम द्यावा. परंतु, यंदा ‘राष्ट्रीय डाक सप्ताह‘ च्या निमित्ताने ‘पोस्ट‘ च आमच्या घरी आलं आणि त्यांच्या विभागातला एक कलाकार म्हणून त्यांनी मलाच पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केला! त्यांचे धन्यवाद!! आणि सर्व पोस्ट कर्मचारी बंधू - भगिनिंना ह्या #nationalpostalweek च्या शुभेच्छा!!! @indiapost_news @india_post_ #mumbainorthwest #indiapost @ravishankarprasad #postman

A post shared by Avadhoot Gupte (@avadhoot_gupte) on

 

यावेळी अवधूतने एक फोटो पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘चिट्ठी आयी है” पासून “संदेसे आते हैं ” पर्यंत, भारतीयसिने आणि सुगम संगीतामध्ये पत्रं आणि पोष्टाचं स्वतःचं एक वेगळं स्थान कायमच राहिलेलं आहे. आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये क्षणात इथून तिथे पोहोचणाऱ्या ईमेलला ‘पत्रा‘ची सर येणे केवळ अशक्य! पत्राला कसा.. आपल्या दूरवरच्या माणसाच्या हाताचा स्पर्श असतो.. त्याच्या शाईचा वास येतो! आणि त्यात भर पडते ती म्हणजे उन्हातान्हातून पॅंडल मारत तुमच्यापर्यंत पत्र पोहोचवणाऱ्या त्या पोस्टमनच्या श्रमांची. 
खरं तर, प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी कुठलेही काम न काढता पोस्टात जावे आणि तिथल्या आपल्या पोस्टमास्तरला आणि पोस्टमनला एखादा गुलाबाचा गुच्छ सप्रेम द्यावा. परंतु, यंदा ‘राष्ट्रीय डाक सप्ताह‘ च्या निमित्ताने ‘पोस्ट‘ च आमच्या घरी आलं आणि त्यांच्या विभागातला एक कलाकार म्हणून त्यांनी मलाच पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केला! त्यांचे धन्यवाद!! आणि सर्व पोस्ट कर्मचारी बंधू - भगिनिंना ह्या #nationalpostalweek च्या शुभेच्छा!!

Recommended

PeepingMoon Exclusive