अभिनेत्री मिथिला पालकरचा हा धमाल डान्स पाहिलात का?

By  
on  

अभिनेत्री मिथिला पालकरला अभिनयासोबतच डान्सचीही आवड आहे. बबली लूक असलेली अभिनेत्री मिथीला सोशल मिडीयावर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी वेबसिरीजबद्दल, एखाद्या अॅड शूट निमित्त तर कधी विविध बोल्ड फोटोंमुळे किंवा ट्रॅव्हल डायरीमुळे. आताही मिथिलावर चाहते फिदा झाले आहेत. 

 

 

मिथिलाने तिच्या इन्स्टावर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये ती ‘बन ठन चली’ या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. मिथिलाने दोन दिवसात या गाण्यावर डान्स बसवून सादर केला आहे. तिच्या या डान्सवर नेटिझन्सतर फिदा झाले आहेतच पण अनेक सेलिब्रिटीही तिच्या या कौशल्याचं कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेत्री गिरीज ओकने ‘पुढच्या वेळी मलाही तुमच्यात घ्या ना’ असं म्हणत कौतुक केलं आहे. याशिवाय सखी, सुव्रत यांनीही तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

Recommended

Loading...
Share