स्वप्नील जोशीने शेअर केलं या कर्तृत्ववान दुर्गेची गोष्ट

By  
on  

या नवरात्रीमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या आसपासच्या आणि आयुष्यातील अनेक दुर्गांना भेटीला आणतो आहे. त्यापैकीच आज त्याने डॉ. नीता वर्टी! यांच्याबाबत शेअर केलं आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्वप्नील म्हणतो, ‘भारतातल्याच नव्हे तर आशियातल्या उत्तम gynacs पैकी एक नाव म्हणजे डॉ. नीता वर्टी!

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

भारतातल्याच नव्हे तर आशियातल्या उत्तम gynacs पैकी एक नाव म्हणजे डॉ. नीता वर्टी! शैलेश परुळेकर हे नाव ऐकलं नाही असा माणूस विरळाच. शैलेश सरांमुळे माझी नीताताईंशी ओळख झाली. ओळख कधी घरोब्यात बदलली मलाच कळलं नाही. इतकं मोठं व्यक्तिमत्व असताना, इतका मान, इतकं ज्ञान असताना माणूस एवढा साधा, सरळ, humble कसा असू शकतो याचं त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. असं म्हणतात की आंब्याच्या झाडाला जसा मोहोर येत जातो तसं ते झुकतं. मला वाटायचं की ही दंतकथा आहे. पण नीता ताईंकडे बघून वाटतं की आपलं अपयश… यश… परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं आणि आपण त्या ओझ्यातून रिक्त होऊन जावं. हा जगण्यातला अलिप्तपणा मी त्यांच्याकडून शिकतोय... शिकत राहीन… आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती प्रत्येकाला भेटतेच जिच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं. अशा या दुर्गांचा आदर करुया, सन्मान करुया! #navratri2020 #durgapuja

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP