By  
on  

ह्या प्रसिध्द मराठी अभिनेत्रीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणा-याला अटक

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगनेला एका धमकी देणा-या फोन कॉल्सने त्रस्त केलं  होतं. हा तरुण ह्या अभिनेत्रीला सतत  बलात्कार व जीवे मारण्याची धमकी फोनवरुन द्यायचा. या प्रकरणी अहमदनगर येथून एका 27 वर्षीय तरुणाला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली.

संदीप वाघ असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून तो गेल्या वर्षभरापासून ह्या अभिनेत्रीला त्रास देत आहे. ही अभिनेत्री राजकारणात सक्रीय असून तिचे अहमदनगर येथे आंदोलनाच्या निमित्ताने जाणे-येणे होते. येथूनच आरोपीने अभिनेत्रीचा संपर्क क्रमांक मिळवला. ह्या तरुणाने  अभिनेत्रीकडे वाढदिवसाच्या पार्टीला येणार का अशी विचारणा केली त्यावर तिने मी याचे  एक लाख रुपये आकारते असे सांगितले. त्यांनतर ह्या तरुणाने सतत शिवीगाळ करत ह्या अभिनेत्रीला त्रास देण्यास सुरुवात केली. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive