By  
on  

पार्थ भालेरावच्या अदाकारीचा जलवा आता टेलिव्हिजनवर

पार्थ भालेरावने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. भूतनाथ रिटर्न्स, किल्ला, लालबागची राणी, बॉईज, बॉईज -२, गर्ल्स या सिनेमातील त्याच्या अभिनयाची दखलही घेतली गेली आहे. पार्थ आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. झी वाजवा हे नवीन संगीत चॅनेल प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पार्थ भालेराव पहिल्यांदा टीव्हीवर घेऊन येतोय नवाकोरा भन्नाट युथफुल कॉमेडी शो "भावड्याची चावडी" फक्त आपल्या 'झी वाजवा' वर... टाटा स्काय: चॅनल नंबर 1278, डिश टीव्ही: चॅनल नंबर 1245, D2H: चॅनल नंबर 765, हॅथवे: चॅनल नंबर 522. आणि बाकी सर्व केबल व डिश नेटवर्क वर उपलब्ध. @parthbhalerao #ZeeVajwa #ZeeVajwaKshannGajwa #ParthBhalerao #BhavdyachiChawdi

A post shared by Zee Vajwa (@zeevajwa) on

 

या वाहिनीवर आठवड्याच्या शेवटी एक अनोखा विनोदी कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘भावड्याची चावडी’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमातील भावड्या हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमातून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सेलिब्रिटी गेस्ट म्हणून येताना दिसतील.

Recommended

PeepingMoon Exclusive