‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेतील हा अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत

By  
on  

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिका अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील गावस्कर कुटुंबियांमधील बाँडिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कुटुंबातील एक सदस्य रिअल लाईफमध्ये लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

 

 

या मालिकेत हर्षद गावस्करची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता गुरु दिवेकर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. विशेष म्हणजे त्याची पत्नीही अभिनेत्री आहे.  गुरु अभिनेत्री मधुरा जोशीसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. हे दोघेही यापुर्वी ‘सारेच तुझ्याचसाठी’ या मालिकेत एकत्र झळकले आहेत. यांच्या लग्नाचे फोटो जरूर पाहा.

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share