By  
on  

'बहिर्जी स्वराज्याचा तिसरा डोळा या सिनेमात दिसणार स्वराज्यस्थापनेतील धाडसी शिलेदाराची गाथा

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.  हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अशा उद्धवलेल्या समस्यांचा मागोवा घेताना शूर मावळ्यांचा इतिहास उलगडत जातो.

आणि या दरम्यान इतिहास आपल्याला अशाच एका अज्ञात यशस्वी शिलेदाराचे नाव उलगडवतो. अर्थात या धाडसी शिलेदाराचे नाव बरेचजण ऐकून असतील, पण त्यांचे कर्तृत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आढळते. हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर  'बहिर्जी नाईक'. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच 'बहिर्जी' स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. 

नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे सर्व सिने रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. लेखक किरण माने यांनी या चित्रपटाकरीता  लेखनाची धुरा सांभाळली असून 'काक माय एंटरटेनमेंट' प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत.

नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक  पोस्टर प्रदर्शित झाले असून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून इतिहासामध्ये बहिर्जीना दिली गेलेली उपाधी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive