By  
on  

रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या शॉर्टफिल्मध्ये झळकतायत नागराज मंजुळे

अभिनेता रितेश देशमुख हा बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीसुध्दा तितक्याच दिमाखात गाजवतो. अभिनयासोबतच रितेश देशमुख निर्मिती क्षेत्रामध्येसुध्दा तितकाच मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतो.

 रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. लवकरच ही संस्था काही मराठी शॉर्टफिल्म्सची निर्मिती करतेय. एका पोस्टमनची गाथा सांगणारी एक नवी-कोरी शॉर्ट फिल्म लवकरच येतेय. तार असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. मुख्य म्हणजे या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिध्द दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे प्रमुख भूमिकेत आहेत. नाळ यासिनेमानंतर ह्या शॉर्टफिल्ममध्ये ते झळकतायत. युवा दिग्दर्शक पंकज सोनवणे यांनी ह्या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन  केलं आहे. 

 

 

रितेश देशमुखने 'तार' या शॉर्टफिल्मची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवरुन उलगडली आहे. सोबतच तारमधील नागराज मंजुळे यांचं पोस्टमनच्या रुपातलं सुरेख इल्यूस्ट्रेशन केलेलं पोस्टरही शेअर केलंय. 

तसंच तुम्हाला माहितच आहे एक भव्य-दिव्य आगामी प्रोजेक्ट रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे एकत्रित घेऊन येत आहेत. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करतायत. या भव्य अशा चित्रपटाला संगीत देण्याची धुरा अर्थातच अजय-अतुल यांना सोपावण्यात आली आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असे कळते.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive