By  
on  

' कुमार सानू यांच्या ह्या दिवट्याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?'

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त रिेएलिटी शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचा सध्या सुरु असलेला 14 वा सीझन आता मोठ्या वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याला कारणंही तसंच मोठं आहे. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अपशब्द काढल्याने बिग बॉसचा स्पर्धक जान कुमाला मनसेच्या अमेय खोपकरांनी थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.  

काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर ह्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अनेक मराठी कलाकार ह्यावर आपल्या  प्रतिक्रीया देत संताप व्यक्त केला आहे. 

 

 

मराठीतील प्रसिध्द निर्माते- दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूला खडसावले आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive