By  
on  

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने शेअर केला परफेक्ट फॅमिली पिक्चर

बॉलिवुडची धकधक गर्ल  माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणं ती पसंत करते. कधी डान्स व्हिडीओज तर कधी किचनमध्ये विविध रेसिपीज करुन दाखवत पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत केलेली धम्माल ती शेअर करते. माधुरीची प्रत्येक पोस्ट ही खासच असते आणि ती चाहत्यांची मनं जिंकते. 

आत्तासुध्दा माधुरीने एक गोड पोस्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. आपल्या कुटुंबाचा हा परफेक्ट फॅमिली पिक्चर माधुरीने पोस्ट केला आहे. यात पती डॉ. श्रीराम नेने, दोन टीनएजर्स मुलं रियान आणि रिदान यांच्यासोबत माधुरीची आई असा ह्या कुटुंबाचा गोड फोटो आहे. चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी हा सुंदर फोटो क्लिक करण्यात आल्याचं माधुरीने म्हटलं आहे. 

 

 

माधुरी पुढे या पोस्टला कॅप्शन देताना म्हणते, “ सणासुदीचे उत्साहाचे दिवस संपलेत आणि  मी आता कामाला सुरुवात केली आहे. पण फेस्टिव्ह सीझननंतर एकत्रित कुटुंबाच्या या गोड आठवणी मी आता सेटवर खुप मिस करतेय.” 
 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive