By  
on  

ही आहे प्रशांत दामलेंची मत्तं बातमी, नाटक झालं अनलॉक

प्रसिध्द नाट्य-सिने  अभिनेते प्रशांत दामले हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. चाहत्यांशी संवाद साधतात. त्यांची मतं जाणून घेतात. दोन दिवसांपूर्वीच प्रशांत दामले यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टची प्रसिध्दी माध्यमांसह चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. 

प्रशांत दामले यांनी आपल्या पोस्टमध्यो म्हटलं होतं, 'लवकरच एक मत्तं आनंदाची बातमी देणार आहे मी...'. ही प्रशांत दामले यांची मिश्कील पोस्ट चर्चेचा विषय जरी ठरत असली तरी प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी होती. अखेर यावरुन आता पडदा उलगडला आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे नाटक अनलॉक होण्याची. 

प्रशांत दामले आणि कविता मेढेक अभिनीत सर्वांचं लाडकं सुपरहिट नाटक एका लग्नाची पुढची गोष्टचे प्रयोग येत्या १२ डिसेंबर आणि १३ डिसेंबरला अनुक्रमे कोथरुड आणि पुण्यात पार पडतील. ही नाट्यवर्तुळासह नाट्यरसिकांसाठी खुप मोठी आनंदाची बातमी आहे.  करोना वॉकडाऊनच्या काळात ६-७ महिने नाट्यगृह बंदच होती. आता ब-याच कालावधीनंतर तिसरी घंटा ऐकू येणार आहे. 

 

 

 

झी मराठी प्रस्तुत एका लग्नाची  पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाची माहिती सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून रसिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशांत दामले यांची ही मत्तं बातमी खरंच मस्त आहे, असं म्हणावंच लागेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive