By  
on  

'वाजवूया बँड बाजा' चित्रपट ११ डिसेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे सावट कोसळल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. मात्र सरकारच्या नियमावलींचे पालन करत आता चित्रपटसृष्टीतले काम सुरळीत मार्गाने सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच सरकारने चित्रपटगृहांना मान्यता दिल्याने एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' या बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होण्यास  सज्ज झाला आहे.  

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवुया बँड बाजा'ची गमतीदार कथा संजीव तिवारी लिखित असून  प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे लिखित आहेत. या चित्रपटात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, प्रीतम कागणे, कांचन पगारे, नागेश भोसले, अभिजीत चव्हाण, रुचिरा घोरमोरे, आश्विनी खैरनार, भाग्यश्री देसाई, विशविजय.जी, महेंद्र तिसगे, कपिल गुडसरकर, सुधाकर बिराजदार, अमीर तडवळकर या कलाकारांनी आपल्या कलेची उत्तम मांडणी आपल्या भूमिकांमधून साकारली. 

तरुणांना आकर्षित करणारा 'वाजवूया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील मंडळींना आवडेल असा आहे. 'वाजवूया बँड बाजा'  प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी  येत्या ११ डिसेंबर २०२० ला सर्वत्र महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive