By  
on  

पाहा Photos : गुलाबी रंगाच्या साडीत सई ताम्हणकर दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीच नाही तर हिंदी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचा विविध सोहळ्यासाठी, कार्यक्रमासाठीचे पेहराव हे नेहमीच लक्षवेधी ठरतात. कधी वेस्टर्न तर कधी पारंपारिक वेशभुषाही सई कमाल पद्धतिने सांभाळते. 

सईने सोशल मिडीयावर नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. सईच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. याचं कारण म्हणजे या फोटोंमधील सईचा सुंदर लुक. गुलाबी रंगाच्या साडीतील या फोटोशुटमध्ये सईच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. सईच्या चाहत्यांनाही तिचा हा खास लुक प्रचंड आवडला आहे. कानात डायमंडचे दागिने एवढा मोजकाच साज या लुकसाठी सईने केला आहे. 

या पोस्टमध्ये सईने हटके कॅप्शनही लिहीलं आहे. चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही सईच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर खुशबूने सईच्या या अदा कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. 

सोशल मिडीयावर सई तिच्या विविध फोटोशुट आणि लुक्सचे फोटो शेयर करत असते. तिच्या साडी लुकमधील फोटोंना नेहमीच पसंती मिळताना दिसते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive