By  
on  

अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचं निधन

'जय मल्हार' मालिकेतील बानू बया म्हणून आणि नंतर 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील शनाया म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली  मराठी अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इशाने याबद्दलची माहिती दिली. इशाचे वडील चैतन्य केसकर यांची २४ नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मालवली. वडिलांचा फोटो व त्यासोबत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहित इशाने ही पोस्ट शेअर केली. वडीलांच्या निधनानंतर इशा पूर्णपणे कोलमडून गेल्याचं तिच्या निकटवर्तियांकडून समजतंय. 

 

 

 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या इशाचे अनेकदा आई-वडीलांसोबतचे फोटो पाहायला मिळायचे. दिवाळीच्या सणा-सुदीच्या निमित्ताने इशाने अलिकडेच बाबांसोबतचे फोटो शेअर केले होते. 

बाबांसाठी खास पोस्ट करत इशा म्हणते, "बाबुस्की, तू बेस्ट आहेस. दहावीचा रिझल्ट, मी केलेल्या कॉलेजची निवड, जपानचं स्कॉलरशिप आणि माझ्या करिअरची निवड.. जेव्हा संपूर्ण जग आणि आईसुद्धा माझ्या गोष्टींना नकार देत होती, तेव्हा तू हो म्हणालास. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ISHA (@ishackeskar)

याशिवाय मी बॅंकेचं काम पूर्ण केल्याचंसुध्दा तिने बाबांसाठी ह्यात आवर्जून नमूद केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive