By  
on  

पाहा अभिनेत्री सई लोकुरच्या मेहंदी सोहळ्यातले हे खास फोटो

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नगाठ बांधणार असून तिच्या घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच सईचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यातले खास फोटो सोशल मिडीयाच्या माध्यनमातून पाहायला मिळाले. 

भावी पती तिर्थदीप सोबतचे हे फोटो पोस्ट करताना सईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सई  तिच्या भावी आयुष्याचं छान सुखचित्र पाहतेय. सईने संपूर्ण हातभर आणि पायभर मस्त मेहंदी काढल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळतंय. तसंच हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती खुपच गोड दिसतेय. तर तिचे भावी पती तिर्थदीप रॉयनेसुध्दा छान पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन हा सोहळा एन्जॉय करतायत.  

 

 

 

येत्या 30 नोव्हेंबरला बेळगावात सई आणि तिर्थदीपचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाला आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिल्याने सईचा आनंदाला उधाण आलं आहे. मोजकेच  नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या  उपस्थितीत सई बोहल्यावर चढणार आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive