By  
on  

उर्मिला मातोंडकरचं राजकारणात पुनरागमन, शिवसेनेत करतेय प्रवेश

कॉंग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणारी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही आता शिवसेनेत प्रवेश करतेय. शिवसेनेच्या पदाधिका-यांनी रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली होती. 2019 साली  झालेल्या लोकसभा निवडणूकीत उर्मिला कॉंग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरली होती. परंतु ती ही निवडणूक जिंकू शकली नाही. या पराभवानंतर उर्मिलाने कॉंग्रेस पक्षातून आपला राजीनामा दिला. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला शिवसेनेत सहभागी होईल, असं मुख्यमंत्र्यांचे सहकारी हर्षल प्रधान यांनी रविवारी घोषित केलं आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेसाठी शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकरचं नाव राज्यपाल बीएस कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याचं कळतंय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive