By  
on  

शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांच्या इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी रंगीला गर्ल आपली मराठमोळी उर्मिला मातोंडकर हिने मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. 

 

शिवसेनेकडून पक्षप्रवेशाबाबत कोणताही आग्रह धरण्यात आलेला नव्हता, पण मी स्वत:हूनच सक्रिय राजकारणात परतण्यासाठी निर्णय घेतला, असं त्यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं. त्यानंतर एका इन्स्टाग्राम पोस्टने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

 

 

 साडी परिधान करून एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली कॅप्शन देत उर्मिला म्हणतात.. “(माझ्याकडून) नेहमीच तुम्हा सर्वांना सकारात्मक ऊर्जा, प्रेम, कारूण्य आणि सदिच्छा मिळत राहतील” 

 

Recommended

PeepingMoon Exclusive