By  
on  

हा फोटो शेअर करत प्रियांका बर्वेने चाहत्यांशी शेअर केली गोड बातमी

डबलसीट, रमा माधव, मुंबई पुणे मुंबई 2, पानिपत या सिनेमातील गीतांना सुरेल आवाजाने सजवलेली गायिका प्रियांका बर्वेने चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली आहे. प्रियांका लवकरच आई होणार आहे. प्रियांकाने पती सारंग कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती बेबी बम्प फ्लाँट करताना दिसते आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Excited & nervous for our biggest release ever! Priyarang’s best till date. Need your wishes & blessings.

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve) on

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांका म्हणते, ‘ आमच्या या सर्वात मोठ्या रिलीजसाठी एक्साईटेड आणि नव्हर्स आहे. प्रियारंगचं आतापर्यंतचं सर्वात बेस्ट. तुमच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांची गरज.’  प्रियांका अलीकडेच ‘रारारमपम’ या ऑनलाईन शोच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. प्रियांकाच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive