By  
on  

शिक्षक आई-वडिलांप्रती रिंकू राजगुरुने व्यक्त केली कृतज्ञता

सैराटची आर्ची म्हणून महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या कानाकोप-यात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी रिंकुला राष्ट्रीय सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर तिच्या यशस्वी सिनेकारकिर्दीला सुरुवात झाली. कागर, मेकअप अशा  मराठी सिनेमांसह तिने हिंदीतही दमदार पदार्पण केलं. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता स्टारर हंड्रेड या धमाकेदार वेबसिरीजमध्ये रिंकूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.  लारासोबत रिंकूला  स्क्रीन शेअर करताना पाहणं तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच होती.

रिंकू अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी संपर्कात राहणं पसंत करते. अनेकदा तिने तिच्या आई-वडीलांसोबतचे फोटो पोस्ट केलेले तुम्ही पाहिले असतील. रिंकूचे आई-वडील हे दोघंही शिक्षक आहेत. त्यामुळे तिच्या घरी साहजिकच शिक्षणाला खुप महत्त्व आहे. आज शिक्षक दिनानिमित्त रिंकूने तिच्या या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy teachers day mummy and pappa

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकू म्हणते, "माझे आई वडील दोघंही शिक्षक आहेत. तेच माझ्या आयुष्यात गुरुस्थानी आहेत. पण ते फक्त माझ्यासाठीच नाही तर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीसुध्दा ते उत्कृष्ट शिक्षक आहेत . ते माझे मार्गदर्शक, माझी प्रेरणा आणि माझे गुरु असण्याशिवायच  माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्यांच्यातील सामर्थ्य, दयाळूपणा आणि  सहानभूतीशील वृत्तीमुळे ते समोरच्याची मनं जिंकतात. त्यांच्याबद्दल मी कशी कृतज्ञता व्यक्त करु हेच समजत नाही. त्यांच्या माझ्यावरचा विश्वास, माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे रहाण्यामुळेच मी आज जे काही यश संपादन केलं आहे, त्याचं श्रेय त्यांना जातं. तेच माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

Recommended

PeepingMoon Exclusive