By  
on  

ट्वींकल नाही तर घरातील ही व्यक्ती बनवते सगळ्यात उत्तम जेवण, अक्षय कुमारने केला खुलासा

अक्षय आणि ट्वींकलला एकत्र पाहणं ही त्यांच्या फॅन्ससाठी पर्वणीच असते. ट्वींकलचं डिजीटल व्हेंचर असलेल्या ट्वीक इंडियासाठी या जोडीने एकत्र येऊन मुलाखत दिली आहे. एका छोट्या फॅनने ट्वींकलला विचारलं की घरात सगळ्यात उत्तम शेफ कोण आहे. यावर ट्वींकलने तिला स्वयंपाक येत नसल्याचं सांगितलं.

 

 

अक्षय सुट्टीदिवशी घरी चॉकलेट पराठे बनवत असला तरी आरव हाच उत्तम शेफ असल्याचं दोघांनीही मान्य केलं. पण अक्षयने मी दोन नंबरचा उत्तम शेफ असल्याचंही सांगितलं.  अक्षय आणि ट्वींकलने ट्वीक इंडियाद्वारा लाँच केलेल्या पुस्तकांपैकी एक पाहून तिची मस्करी केली. यापुढे तो म्हणतो, ‘ टीना या कुक बूक मुळे तरी होपलेस शेफचा किताब मिळवू शकते.’ आपल्या आवडत्या सुपरहिरोबाबत बोलताना अक्षय म्हणतो, टारझन माझा आवडता सुपरहिरो आहे. तर रिअल लाईफचे रोल मॉडेल ट्वींकलसाठी सुपर हिरो आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive