अक्षय कुमारच्या 'बेलबॉटम'चं नवीन पोस्टर, ह्या दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

By  
on  

बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमारने नुकतंच  'बेलबॉटम'चं एक पोस्टर उलगडण्यासोबतच या सिनेमाचं शूटींग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. तसंच हा सिनेमा 2 एप्रिल 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  अक्षयने नुकतंच इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. 

. अनलॉकमध्ये या सिनेमाच्या शूटींगला स्कॉटलंड येथे सुरुवात झाली होती. यासाठी संपूर्ण टीम योग्य त्या खबरदारीसह स्कॉटलंडला  रवाना झाली. तिथे आधी ही संपूर्ण टीम 14 दिवस क्वारंटाईन म्हणून रहात होते.

तसंच परदेशात शुटींग करताना  निर्मात्यांना लॉकडाऊनचा फटकासुध्दा बसला होता. म्हणूनच हे नुकसान टाळण्यासाठी व शूटींग पूर्णत्वास नेण्यासाठी सुपरस्टार अक्षय कुमाने त्याचा अनेक वर्षांचा आठ तासांच्या शिफ्ट करण्याचा नियम मोडला. त्याने अधिक तास शूटींग करत निर्मात्यांचं नुकसान होण्यापासून बचाव ेकला व अखेरीस   'बेलबॉटम'चं शूटींग पूर्ण झालं असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

 

 

काही दिवसांपासून 'बेलबॉटम'च्या सेटवरुन अक्षयचे काही लुक्स व्हायरल होत होते. ज्यात अक्षयचा  रेट्रो लुकमध्ये पाहायला मिळाला. हा सिनेमा 80 च्या दशकांती ल कथानकावर आधारित आहे. या सिनेमात अक्षय एका गुप्तहेराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हायजॅक झालेल्या एका भारतीय विमानातील 212 प्रवाशांच्या सुटकेसाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share