रेखा यांचा टेलिव्हिजनवर डेब्यू, ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत दिसणार रेखा ?

By  
on  

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना अभिनय करताना, नृत्य सादर करताना पाहणं ही एक ट्रीट असते. आणि आता त्यांच्या चाहत्यांसाठी त्या नवं काहीतरी घेऊन येत आहेत. अनेक वर्षांनंतर रेखा या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रेखा यांचा टेलिव्हिजन डेब्यू होत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'गुम है किसी के प्यार में' या टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून त्या टिव्हि दुनियेत पदार्पण करत आहेत. 

 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटरवर या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो शेयर करण्यात आला आहे. ज्यात रेखा दिसत आहेत. त्या रेखा या नव्या मालिकेच्या भूमिकांविषयी बोलत आहेत.. विरलने या पोस्टमध्ये लिहीलय की, “रेखा यांचा मोठा टेलिव्हिजन डेब्यू आणि मेजर कमबॅक. पहिल्यांदा विरल भयानीवर. दिग्गज अभिनेत्री रेखा छोट्या पडद्यावर जादू करण्यासाठी सज्ज दिसतेय.”

या प्रोमोमध्ये रेखा या नव्या मालिकेविषयी बोलत आहेत. मात्र रेखा या मालिकेत दिसणार का ? काय असेल रेखा यांची या मालिकेतील भूमिका हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share