अभिनेत्रीवर लैंगिंक अत्याचार प्रकरण: अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस ठाण्यात हजर

By  
on  

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आज 1 ऑक्टोबर रोजी अंधेरीच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिंक अत्याचार  केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलिस ठाण्यात  एफआयआरही दाखल केला होता. 

या  लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार तो आज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला. 

 

 

 

एफआयआर दाखल करताना पिडीत अभिनेत्री पायल हिचे वकील एड. सातपुते यांच्यानुसार त्यांनी त्यांच्या अशिलाने दिलेले सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्त केले आहेत, आता पुढील तपास पोलिस योग्य रितीने करतील व लवकरच अनुरागला अटक होईल अशी आशासुध्दा त्यांनी व्यक्त केली आहे. 

 

दरम्यान, अनुराग कश्यपने माझ्यासोबत असभ्य आणि गैरवर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली गेली होती. असं पिडीत अभिनेत्रीने म्हटलंय  पण अनुरागने मात्र तिचे सर्व आरोप फेटाळले होते. 

Recommended

Loading...
Share