बेरोजगार म्हणल्यावर अभिषेक बच्चन म्हणतो, ‘ तुम्हाला आमचं काम आवडलं नाही तर पुढची नोकरी कोणीही देणार नाही

By  
on  

15 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा सिनेमागृह सुरु होणार आहेत. केवळ 50% प्रेक्षकांसह सिनेमागृह सुरु करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने याविषयी आनंद व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. 

यावर ट्रोलर्सनी मात्र ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. युजर म्हणतो, ‘‘पण तरीसुद्धा तुला असं नाही वाटत का तू बेरोजगार राहणार आहेस? यावर अभिषेकने त्याच्या नेहमीच्या कुल अंदाजात उत्तर दिलं की, ‘ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला आमचे पुढचे काम मिळणार नाही. त्यामुळे आम्ही १०० टक्के देऊन काम करत असतो आणि चांगलच होईल यासाठी प्रार्थना करतो’.  अभिषेकला अनेकदा ट्रोलर्सच्या मा-याला सामोरं जावं लागतं. पण तो खिलाडूवृत्तीने ट्रोलर्सना उत्तरं देतो.

Recommended

Loading...
Share