वर वधूच्या लूकनंतर अनुप जलोटा-जसलीन दिसले या अवतारात

By  
on  

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी काही दिवसांपुर्वीच वधु-वराच्या वेषातील फोटो शेअर केला होता. बिग बॉसच्या त्या पर्वात फक्त हे दोघंच विविध कारणांनी चर्चेत राहिले होते. या फोटोंनी चांगलीच खळबळ उडवली होती. हे दोघेही 'वो मेरी स्टूडेंट है' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु करणार आहेत. 

 

 

आताही या दोघांनी एक नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघंही रॅपरच्या लूकमध्ये दिसत आहेत. या सिनेमातील रॅप साँग शुटिंगच्या दरम्यान या लूकचे फोटो शेअर केले होते. यावेळी जसलीन आणि अनुप यांचे वर वधू वेषातील फोटो पाहून चाहते चक्रावून गेले होते. जसलीन ही जलोटा यांच्यापेक्षा वयाने 37 वर्षांनी लहान आहे. आता या दोघांच्या प्रेमकहाणीवर सिनेमा येतोय.

Recommended

Loading...
Share