मराठी फिल्म 'हबड्डी' आणि विद्या बालनच्या 'नटखट'ने होणार मेलबर्न चित्रपट महोत्सवाला सुरुवात

By  
on  

मराठी सिनेमा 'हबड्डी' आणि विद्या बालन सहनिर्मित लघुपट 'नटखट' 23 ऑक्टोबरला मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहेत. या दोन सिनेमांनी या महोत्सवाची सुरुवात होऊन या फिल्म्स महोत्सवाचं उद्घाटन होईल. सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत हा व्हर्चुअल महोत्सव पार पडणार आहे. 

नचिकेत सामंतच्या 'हबड्डी' या सिनेमात एका तरूण मुलाची कहाणी आहे. जो भाषण बाधीत आहे. तर दुसरीकडे 'नटखट' सिनेमात एका आईच्या संघर्षाची कहाणी आहे  जी तिच्या लहान मुलाला स्त्री-पुरुष समानतेविषयी शिकवते. या लघुपटाने विद्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. 

 दरवर्षी 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येतो. यावर्षी मात्र 23 ते 30 ऑक्टोबर दरम्यान हे महोत्सव आयोजित करण्यात येईल. मात्र याआधी महोत्सवाचे दिग्दर्शक मितु भौमिक लैंगे यांनी मूळ स्थानी एका कॉम्पॅक्ट वेळापत्रकासह करण्याची आशा केली होती. मात्र सध्या सुरु असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती लक्षात घेता हे महोत्सव सेट ऐवजी ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. 

Recommended

Loading...
Share