करीनाने दिल्लीमध्ये पुर्ण केलं ‘लाल सिंह चढ्ढा’ चं शुटिंग, पाहा फोटो

By  
on  

आमीर खान आणि करीना कपूरच्या लाल सिंह चढ्ढाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. लॉकडाऊननंतर उर्वरित भागाचं शुटिंग करीनाने नुकतंच पुर्ण केलं आहे. सप्टेंबरच्या अखेरीस करीना दिल्लीला रवाना झाली आहे. यावेळी सेटवर सुरक्षेच्या मापदंडाचं पुरेपूर पालन केलं आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘‘प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो. आज मी माझा सिनेमा लालसिंहचढ्ढा चं शुटिंग पुर्ण केलं. कठीण वेळ, साथ, माझी प्रेग्नेंसी, नर्व्हसनेस कोणतही कारण शुटिंगला थांबवू शकली नाही.’ 
सैफ आणि तैमूरला घेऊन मागील महिन्यात करीना दिल्लीला पोहोचली होती. करीनाचं बेबी बंप दिसत असल्याने त्याठिकाणी व्हीएफएक्स वापरलं जाणार आहे. हा सिनेमा फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे.

Recommended

Loading...
Share