भारतासाठी पहिला ऑस्कर जिंकणा-या ‘भानू अथय्या’ यांनी घेतला अखेरचा श्वास

By  
on  

भारतासाठी ऑस्करची बाहुली जिंकणा-या प्रसिद्ध वेशभुषाकार भानू अथय्या यांचं निधन झालं आहे. त्या 91 वर्षांच्या होत्या. अथय्या यांना रिचर्ड अटेनबर्गच्या ‘गांधी’ सिनेमातील वेशभुषेसाठी हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. 

 

 

मुलगी राधिका यांनी ही बातमी शेअर केली. झोपेतच त्यांना मृत्यू आल्याचं यावेळी तिने सांगितलं. त्यांनी काम केलेला ‘स्वदेस’ हा अखेरचा सिनेमा होता. याशिवाय त्यांनी सी.आय. डी, प्यासा, कागज के फुल, वक्त, आरजू, रात और दिन, जॉनी मेरा नाम, गीता मेरा नाम, एक दुजे के लिए, लगान या सिनेमासाठी वेशभुषाकार म्हणून काम केलं.

Recommended

Loading...
Share