बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना करोनाची लागण

By  
on  

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना करोनाची लागण झाली आहे. फेसबुकद्वारे कुमार सानू यांच्या टीमने सर्वांना याबद्दलची माहिती दिली. ‘दुर्दैवाने सानूदा यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. एका मुलाखतीत कुमार सानू यांनी अमेरिकेत कुटुंबियांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा सध्या चर्चेत आहे.  प्रसिध्द रिएलिटी शो बिग बॉस सीझन 14 चा तो एक स्पर्धेक आहे. जान कुमारसुद्धा गायक असून तो कुमार सानू यांची पहिली पत्नी रिटा यांचा मुलगा आहे.

 

Recommended

Loading...
Share