अक्षय कुमारच्या लक्ष्मी बाँबचं हे धमाल गाणं पाहिलं का?

By  
on  

अक्षय कुमारचा आगामी  'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत्या 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो आहे. या दरम्यानच सिनेमातील पहिलं गाणं ‘बुर्ज खलिफा’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  हे गाणे दुबईमध्ये चित्रीत करण्यात आलं  आहे. गाण्यातील अक्षय आणि कियाराचा लूक देखील हटके आहे. ‘आम्ही वर्ष भरातील सर्वात मोठा म्यूझिक ट्रॅक रिलिज केला आहे. पाहा बुर्ज खलिफा गाणं’ हे कॅप्शन देत अक्षयने गाणं शेअर केलं आहे. 

 

 

या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने यांनी केले असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. ह्या हॉरर कॉमेडीपटात अक्षय व कियारा यांच्यासह तुषार कपूर, शरद केळकर आणि अश्विनी कळसेकर आदी कलाकारांच्या अभिनयाचा धमाका पाहायला मिळतोय.

Recommended

Loading...
Share