‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार आणि कियारा लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये उपस्थिती

By  
on  

अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक झालं. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारतोय. त्या व्यक्तिरेखेचं नाव लक्ष्मी आहे. पण ख-या आयुष्यातल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी त्रिपाठी यांनासुध्दा अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आवडला आणि त्यांनी ट्विट करत त्याचं कौतुक. एका लक्ष्मीने दुस-या लक्ष्मीची पाठ थोपटली. आता ह्या दोन्ही लक्ष्मी लवकरच  द कपील शर्मा शोवर हजेरी लावणार आहेत. 
 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्मा सूत्रसंचालन करत असलेला ‘द कपिल शर्मा शो’ नेहमीच चर्चेत असतो. आता या चित्रपटातील बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि ट्रांसजेंडर अॅक्टिविस्ट लक्ष्मी शुक्ला हे कपिल शर्मा शोच्या एका भागात धम्माल उडवताना दिसणार आहेत. 

 

 

अक्षय कुमारने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची संपूर्ण टीम खऱ्याखुऱ्या लक्ष्मीसोबत आज कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे’ असे कॅप्शन दिलं आहे. 

'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा ‘कंचना ’ या सुपरहिट तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक  आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेंमा आहे. यात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो असं काहीसं कथानक ह्यात आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

 

Recommended

Loading...
Share