2021मध्ये येणार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छोटा पाहुणा

By  
on  

भारती सिंह सध्य पती हर्ष लिंबाचियासोबत ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ हा शो होस्ट करत आहे. भारती तिच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. यावेळी भारतीने एक खास अनाउसमेंट केली आहे. भारती ने 2021 मध्ये तिच्याकडे नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं आहे. यानंतर पतीच्या रुपात खरं प्रेम मिळाल्याचंही तिने सांगितलं आहे. या दरम्यान तिने प्रेग्नंसी दरम्यानही काम करत राहणार असल्याचं सांगितलं आहे. 

यासोबतच तिने जज फराह खानचे देखील आशिर्वाद घेतले. यावेळी हर्षची पत्नी असली तरी आईच्याच मायेने ती त्याची काळजीही घेत असल्याचंही तिने सांगितलं.

Recommended

Loading...
Share