म्हणून शरद केळकरने शेअर केला 'तो' फोटो

By  
on  

सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातलं अंतर हे हल्ली सोशल मिडीयामुळे बरंच कमी झालं आहे. व्यक्त होण्याचं सेलिब्रिटींचं हे हक्काचं व्यासपीठ असतं. अनेकदा मजा-मस्तीसोबतच सेलिब्रिटी त्यांचे सुरेख फोटो चाहत्यांशी शेअर करतात. पण बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा दिमाखात फडकवणारा सर्वांचा लाडका अभिनेता शरद केळकरने मात्र एक वेगळाच फोटो पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. त्याच्या ह्या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेदलं आहे. 

हा फोटो पोस्ट करण्यामागे शरदचा खुपच चांगला हेतू आहे. चाहते नेहमी त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं ऐकतात, त्यांचं अनुकरण करतात. म्हणूनच शरदने हा फोटो पोस्ट करत मोलाचा संदेश चाहत्यांना दिला आहे. 

 


 

धुम्रपान करतानाचा शरदचा हा फोटो खरंच आश्चर्यचकित करणारा ठरतोय, पण त्यासोबतच त्याने दिलेला संदेश महत्त्वपूर्ण आहे. तो पोस्टमध्ये म्हणतो, “स्मोकिंग हे एखाद्या फोटोमध्ये जीव नक्कीच ओतू शकतो, पण ख-या आयुष्यात मात्र जीव घेऊ शकतो.जनहितार्थ जारी”

 

 

 

एखाद्या सिनेमासाठी किंवा सहज म्हणूनच शरदने हे हटके फोटोशूट केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. 

Recommended

Loading...
Share