कॅन्सरसोबतच्या लढाईत संजय दत्तचा विजय, शेअर केली ही पोस्ट

By  
on  

61 वर्षांच्या संजय दत्तने चाहत्यांशी एक गुड न्युज शेअर केली आहे. त्याच्या  पॉजिट्रॉन एमिशन टोमोग्राफी रिपोर्टमध्ये तो कॅन्सर मुक्त झाल्याचं समोर येत आहे. संजयने जुळ्या मुलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. यावेळी त्याने फॅन्स आणि कुटुंबाचे आभार मानले आहेत. 

 

यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजय म्हणतो, ‘गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी महत्त्वाचे होते. पण असं म्हटलं जातं मोठ्या लढाईसाठी योद्धेदेखील ईश्वर निवडतो. माझ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त मला हे सांगताना आनंद होतो आहे की मी ही लढाई जिंकलो आहे. कुटुंबाला सगळ्यात महत्त्वाचीभेट्ट म्हणून माझं आरोग्य देत आहे. 11 ऑगस्टला संजयला फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं.

Recommended

Loading...
Share