‘राधे श्याम’ सिनेमातील प्रभासचा नवा लूक आला समोर

By  
on  

‘प्रभास’चा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘राधे’मधील प्रभासचा लूक समोर आला आहे. विक्रमादित्य असं प्रभासच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या सिनेमात प्रभाससोबत पुजा हेगडे दिसते आहे. या फर्स्टलूकमध्ये प्रभास ब्लू जॅकेट, ब्लॅक ट्राउजर अणि पर्पल कलरचा टी-शर्टमध्ये दिसतो आहे. एका व्हिंटेज कारच्या बोनेटवर तो बसला आहे.

 

 

प्रभासचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सेलिब्रेशनला सुरुवात करत निर्मात्यांनी त्याचा लूक समोर आणला आहे. टीसीरीज, कृष्णम राजू, वामसी, प्रमोद आणि प्रसीदा हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. राधा कृष्ण कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. या शिवाय प्रभास ओम राऊतच्या आदिपुरुषमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share