इरफान खानचा हा व्हिडियो पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By  
on  

‘अंग्रेजी मिडियम’ हा इरफान खानचा शेवटचा सिनेमा. या सिनेमाचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक होमी अदजानिया यांनीही इरफानची खास आठवण शेअर केली आहे. अंग्रेजी मिडियमचा Behind the scene होमीने शेअर केला आहे. ‘केवळ हसू न रोखू न शकल्याने आम्ही शुटिंग करू शकलो नव्हतो. या व्हिडियोमध्ये इरफानला दिलखुलास हसताना पाहून चाहत्यांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहतील. 

 

 

इरफानच्या कारकिर्दीतील अखेरचा सिनेमा म्हणून अंग्रेजी मिडियम सिनेमाकडे पाहिलं जातं. या सिनेमातील हळव्या बापाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शवली. या सिनेमानंतर त्याची प्रकृती काहीशी बिघडली. त्यानंतर त्याने कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Recommended

Loading...
Share