नवरात्रौत्सवात बेबीबंपसह सुंदर नटली ही अभिनेत्री, शेअर केला व्हिडीओ

By  
on  

आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी  बॉलिवूडची एक गोड अभिनेत्री म्हणून अमृता रावने स्थान निर्माण केलं आहे. आरजे अनमोलसह विवाहबंधनात अडकल्यानंतर आता अमृताकडे गोड बातमी आहे. ती लवकरच आई होणार आहे. अमृता सध्या नऊ महिन्यांची प्रेग्नेंट असून तिने एक गोड व्हिडीओ नवरात्रीनिमित्त खास चाहत्यांशी शेअर केला आहे. लाल रंगाच्या साडीत नटलेली अमृता ह्या व्हिडीओत बेबी बंप फ्लॉण्ट करताना खुपच सुंदर दिसतेय. 

हा क्युट व्हिडीओ शेअर करत अमृता लिहते, “नवरात्रीत मी गर्भावस्थैत आहे, त्यामुळे खुप छान वाटतंय. हे नऊ दिवस दुर्गा माता आणि तिच्या विविध अवतारांना समर्पित आहेत. त्यात मीसुध्दा आता आई होणार आहे, ही एक सुखद भावना आहे “ 

 

 

अमृता ह्यापूर्वी शेवटची हिंदू हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जीवनपट ‘ठाकरे’ सिनेमात झळकली होती. तिने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली होती. आता लवकरच अमृताच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्याने चाहते प्रचंड खुश आहेत. 
 

Recommended

Loading...
Share