By  
on  

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव निर्मात्यांनी बदलून ठेवलं 'लक्ष्मी'

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमा चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या शीर्षकावरून नवा वाद सुरू झाला . म्हणूनच निर्मात्यांनी  ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव बदलून ठेवलं 'लक्ष्मी'. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु होता. 

 

 

 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केलं आहे. अक्षय कुमारने यापूर्वी  ट्विट करत हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

 

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा ‘कंचना ’ या सुपरहिट तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेंमा आहे. यात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो असं काहीसं कथानक ह्यात आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive