आमीरच्या लेकीचा धक्कादायक खुलासा, झाली होती लैंगिक शोषणाची शिकार
आमीर खानची लेक इरा खान हिने अलीकडेच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिने डिप्रेशनमध्ये असल्याची बाब शेअर केली आहे. यानंतर आणखी एक व्हिडियो तिने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये इराने तिचं वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक शोषण झाल्याची बाब शेअर केली आहे. याकामी मदत करण्यासाठी इराने आई-वडिलांचीही मदत घेतली आहे. यावेळचा अनुभव तिने एका व्हिडियोमधून शेअर केला आहे. आपल्या व्हिडियोमध्ये इरा म्हणते, ‘मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते.
पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. या घटनेने अंतर्मुख झाले. मला नक्की कशाचा त्रास होत होता तेच समजत नव्हतं. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळलं. स्वत:ला पुर्णपणे एकटं केलं. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. कुणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती. परिणामी एक वेळ अशी आली जेव्हा मी डिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.’