By  
on  

सलमानने स्वत:ला केलं आयसोलेट, ड्रायव्हरला झाली करोनाची लागण

आजही म्हणजेच जवळपास वर्षभरानंंतरसुध्दा संपूर्ण जग हे करोना विषाणूच्या विळख्यात आहे. गरीब असो किंवा श्रीमंत कोणीच करोनाच्या कचाट्यातून सुटू शकलेला नाही. दरम्यान आणखी एका बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडालीय, ती म्हणजे बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा ड्रायव्हर व दोन जवळच्या स्टाफ मेंबर्सना करोनाची लागण झाली आहे. 

सलमानच्या हया स्टाफला बॉम्बे  हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच पुढील १४ दिवस सलमान आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेटमध्ये राहणार असल्याचं सांगण्यत येत आहे. तसंच रिपोर्टसनुसार आपल्या स्टाफ मेंबर्सना सर्वात चांगले उपचार मिळायला हवेत यासाठी सलमान खान प्रचंड दक्ष आहे. त्याच्यावतीने योग्य ती सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पण अद्याप खान कुटुंबियांकडून याबाबत कुठलंच अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाही. 

दरम्यान, सलमान सध्या बिग बॉस १४ चं सूत्रसंचालन करतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive