By  
on  

अजय देवगण आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘Mayday’ मध्ये रकुल प्रीत सिंगची वर्णी

अलीकडेच अजय देवगणच्या मे डे मध्ये अमिताभ बच्चन झळकणार असल्याचं समोर आलं आहे. आता या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचं नावही समोर आलं आहे. मे डे मध्ये मध्ये रकुल प्रीत सिंग पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल डिसेंबरमध्ये अमिताभ आणि अजयला सेटवर जॉईन करेल.

 

 

याबाबत रकुल म्हणते, ‘इतर कलाकारांप्रमाणे माझंही स्वप्न होतं की एकदिवस अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करू. मला आनंद आहे की माझं स्वप्न पुर्ण होत आहे. अजय सरांसोबत पुन्हा काम करून मला आनंद होत आहे.’  हा सिनेमात वास्तवातील घटनेवर आधारित आहे. हैद्राबादमध्ये या सिनेमाचं शुटिंग एकाच शेड्युलमध्ये संपवण्याचा अजयचा इरादा आहे. अजय आणि अमिताभ यांनी 'मेजर साब', 'हिंदुस्तान की कसम', 'हम किसी से कम नहीं’ आणि खाकी या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive