By  
on  

अभिनेता अक्षय कुमारने नाहक बदनामी करणा-या या युट्युबरवर ठोकला 500 कोटींचा मानहानीचा दावा

सुपरस्टार अक्षय कुमारने नाहक बदनामी केल्याप्रकरणी युट्युबरवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. राशिद सिद्दीकी असं या युट्युबरचं नाव आहे. राशिदने आपल्या व्हिडियोच्या माध्यमातून अक्षय कुमारचं नाव सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणाशी जोडलं होतं. 

 

यासोबतच त्याने रिया चक्रवर्तीला कॅनडाला पळून जाण्यासाठी मदत केल्याचंही समोर येत होतं. राशिद बिहारचा असून पेशाने इंजिनिअर आहे. ‘FF NEWS’ हे त्याच्या चॅनेलचं नाव आहे. याशिवाय राशिदने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप लावले होते. 
अक्षय सुशांतला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट मिळाल्याने खुश नसल्याचा दावा राशिदने व्हिडीओमध्ये केला आहे. राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive