By  
on  

सुश्मिताची लेक रिनी सेन ‘सुट्टाबाजी’ मधून बॉलिवूड डेब्युसाठी सज्ज, पहा ट्रेलर

सुश्मिता सेनची लेक रिनी सेन सध्या सुट्टाबाजी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रिनी, राहुल वोहरा आणि कोमल छाबड़िया मुख्य भूमिकेत आहेत. रिनी यामध्ये टीनएजरच्या भूमिकेत दिसते आहे तर राहुल आणि कोमल तिच्या पालकांच्या भूमिकेत दिसत आहेत. 

 

 

कबीर खुरानाही सुट्टाबाजीमधून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. लॉकडाऊनवर या सिनेमाची कथा बेतली आहे. यामध्ये एक टिपीकल कुटुंबात लॉकडाऊन दरम्यान  घडणा-या घडामोडींवर भाष्य केलं गेलं आहे. हा सिनेमा डिजीटली रिलीज होणार आहे. हलकी फुलकी कॉमेडी या सिनेमात दिसते आहे. वयाच्या 25 व्या वर्षी सुश्मिताने रिनीला दत्तक घेतलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive